कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच, वाचा देशातील आकडेवारी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच, वाचा देशातील आकडेवारी

देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या

Advertisement
(COVID-19) दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. काल देशात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होऊ लागल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर काल 38 हजार 652 नवे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 507 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 04 लाख 18 हजार 987 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 9 हजार 394 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आज देशात 22 लाख 77 हजार 679 नागरिकाचं लसीकरण पूर्ण झालं आहे. भारतात आत्तापर्यंत 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *