कोल्हापूर जिल्ह्यातील हे मार्ग पावसाने झाले बंद

सलग बरसणाऱ्या संततधार पावसामुळे राधानगरी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक पुर्णपणे बंद झाली. कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा राज्यमार्ग (transport service) बंद झाला.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांनी केली कळकळीची विनंती

फोंडा,कणकवलीकडे जाणारी वाहणे, एस.टी.बसेस सुरक्षित ठिकाणी थांबल्या आहेत. पावसाची संततधार सुरुच आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी महार्गावरील आंबा परिसरात रस्ता खचल्याने वाहतुक खोळांबली आहे. तर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे.

कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगेचं पाणी शहरात

कोल्हापूरहून भोगावती, कौलव, राधानगरीहून कोकणकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे.

हळदी, म्हाळुंगे, परिते, भोगावती याठिकाणी असणाऱ्या ओढ्यावर पाणी आले आहे.

कोकणकडे जाणाऱ्या बसेस,खाजगी वाहतुक जागा मिळेल त्याठिकाणी सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत.

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला जवळील पेट्रोल पंप पूर्ण पाण्याखाली गेला आहे.

तसेच बीड शेड ते शिरोली दुमाला पेट्रोल पंपापर्यंत मार्ग खुला आहे.

अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’… अटकेच्या भीतीने गायब?

आरळे गावापर्यंतच्या मुख्य राज्य मार्गावर (transport service)पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पर्यायी रस्ता सुद्धा बंद आहे, कांचनवाडी ते भाटण वाडी रस्ता बंद आहे.

शिरोली दुमाला, सडोली दुमाला,सावर्डे दुमाला, चफोडी ,गर्जन, आरळे पर्यंत चा मुख्य राज्य मार्ग बंद आहे. याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बरेच रस्ते बंद झाले आहेत.

जाधववाडी निळे या ठिकाणी पाणी आलेने कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे बंद झाला आहे.

तसेच बरकी गावाच्या पुलावर पाणी आल्याने बरकीचा संपर्क तुटलेला आहे.

ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन

मालेवाडी ते सोंडोलीला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने शित्तुर वारून, शिराळे वारून, उखळू, खेडे, सोंडोलीकडे रस्ता बंद झालेला आहे.सोष्टेवाडी जवळ पाणी आल्याने मलकापूर ते अनुस्कुरा रोड बंद झाला. तसेच कडवी नदी पुलावर पाणी आलेने मलकापूर ते शिरगाव रोड बंद झालेला आहे.

चरण ते डोणोली रोड बंद झाला. नांदारी फाट्यावर पाणी आलेने करंजफेन, माळापुडे, पेंढाखले रोड बंद झाला. करुंगळे ते निळे व कडवे ते निळे रोड बंद आहे तसेच उचत ते परळे रोड बंद झाला

वेदगंगा नदीवरील मुरगूड ते कूरणी हा बंधारा पाण्याखाली गेला आहे, पर्यायी रस्ता- निढोरी मार्गे कागल वेदगंगा नदीवरील सुरुपली ते मळगे हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

पर्यायी रस्ता- सोनगे ते बानगे यासह वेदगंगा नदीवरील बस्तवडे ते आणुर पुल पाण्याखाली गेला आहे.

पर्यायी रस्ता- निपाणी मार्गे कागल कोल्हापूर, सोनगे ते बानगे मार्गे आणूरवरील सर्व वाहतूक ही बॅरिकेट लावून बंद करण्यात आली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *