कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगेचं पाणी शहरात

कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगेचं पाणी शहरात

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून पूरस्थितीचा (flood) धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीकडे जात असून जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी घुसल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याच्या शक्यतेने एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल होत आहेत.

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर (flood)आले आहे. बहुतेक सर्व धरणे भरत आली असून धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे .यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत. कोल्हापूर ते गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी हे प्रमुख राज्य महामार्ग रात्री पासून बंद झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *