राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

politics news – करोनाची दुसरी लाट ओसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

Advertisement

अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’… अटकेच्या भीतीने गायब?

करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.(politics news)

सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.

कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगेचं पाणी शहरात



मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. त्याकडे राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केली कळकळीची विनंती

“मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी म्हटलं आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *