पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता

पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात असलेल्या आणि बंगालच्या खाडीत होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (whether report) वर्तवली आहे. विशेष करून कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

Advertisement

कोल्हापुर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही बहुतेक (whether report) ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडला जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार (ता.२५) नंतर मात्र हा पाऊस कमी होत जाईल.



विदर्भातही पुढील ४८ तासात जोरदार ते अतीजोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी वर्तवली आहे. हा संपूर्ण आठवडा तरी राज्यात पावसाची कृपा असेल असे दिसतेय.

Advertisement

user

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *