सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर; पुढील काही दिवसांत दर घसरण्याची शक्यता?

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर; पुढील काही दिवसांत दर घसरण्याची शक्यता?

तेल कंपन्यांनी (Oil Companies) सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीं मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या आठवड्यात शनिवारी डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, तर पेट्रोलच्या किमतीत 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल चे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.45 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 102.08 रुपये, तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

Advertisement

मुंबई शहरामध्ये जिथे पेट्रोलची किंमत 29 मे रोजी पहिल्यांदा 100 रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. अशातच आज तेलाच्या किमती 107.83 रुपये प्रति लिटर आहे. शहरांमध्ये डिझेलच्या किमतीही 97.45 रुपये आहे. ज्या महानगरांमध्ये सर्वाधिक आहे. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती आतापर्यंत 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहे.

लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

डियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती

एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *