सांगली- नद्यांच्या पाणी पातळीतही झाली वाढ

सांगली- नद्यांच्या पाणी पातळीतही झाली वाढ

सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील बहुतांश भागांत संततधार पावसाने हजेरी लावली. चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस (rainfall) सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

Advertisement

अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’… अटकेच्या भीतीने गायब?

सांगलीत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. परिणामी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगेचं पाणी शहरात

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 12.1 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 44.4 मि.मी. पाऊस झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी केली कळकळीची विनंती

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस असा (मि.मी.मध्ये) ः मिरज 7.5, जत 13.7, खानापूर-विटा 2.3, वाळवा-इस्लामपूर 15, तासगाव 4.2, शिराळा 44.4, आटपाडी 2.3, कवठेमहांकाळ 4.6, पलूस 9.6, कडेगाव 5.6.धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस (rainfall) सुरू आहे. धरण क्षेत्रात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस असा ः
कोयना : 109, महाबळेश्वर- : 140, नवजा : 148, चांदोली ः 68.

मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरण 54.49 टक्के (57.35 टीएमसी) तर चांदोली 75.87 (26.10 टीएमसी ) भरले आहे. 24 तासात कोयना धरणात 2.75 टीएमसी तर चांदोलीत 1 टीएमसी वाढ झाली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 94.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *