राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला मोठा झटका

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला मोठा झटका

शिल्पा शेट्टीचा Super Dancer Chapter 4 (reality show) चांगला गाजत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीची (Raj Kundra Pornography Case) केस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परिणामी शिल्पा शेट्टीला याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे.

Advertisement

सोशल मीडियावर शिल्पाला मोठ्या प्रमाणात ट्रोलला सामोरं जावं लागत आहे. राज कुंद्रा प्रकरण शिल्पा शेट्टीच्या करिअरवरही परिणाम करू शकतं, अशी शक्यता आहे.

शिल्पा शेट्टीचा Super Dancer Chapter 4 (reality show) चांगला गाजत आहे. याचं नाव सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमधील यादीत घेतलं जातं.  दिग्ददर्शक अनुराग बासू, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे तीघे या डान्स रिअॅलिटी शोचे जज आहेत.



मात्र मंगळवारी शिल्पा शेट्टी या शोच्या शूटसाठी आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पुढील काही शोमध्येही शिल्पा शेट्टी दिसणार नसल्याचं समोर आलं आहे. शिल्पा शेट्टीच्या जागी आता करिश्मा कपूर या डान्स रिअॅलिटी शोच्या जजची खुर्ची सांभाळणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे. लवकरच ती बहुप्रतीक्षित निकम्मा आणि हंगामा 2 या चित्रपटांत दिसणार आहे.

शिल्पाचा पती राज कुन्द्राच्या अटकेच्या थेट परिणाम तिच्या चित्रपटावर पडू शकतो. त्यामुळे तिच्या अडचणींत वाढ झाल्याचं म्हटलं जातं आहे. 2003 मध्ये आलेल्या हंगामा या विनोदी चित्रपटाचा ‘हंगामा 2’ हा सिक्वल आहे. येत्या 23 जुलैला हा चित्रपटा डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *