आजचे भविष्य (२२ जुलै २०२१)

आजचे भविष्य (२२ जुलै २०२१)

1) मेष

Advertisement
: अतिविचार करू नका. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.

2) वृषभ : वृद्ध (Old) व्यक्‍तींच्यामधे वैचारिक मतभेद होतील. महिलांनी सभोवतालच्या व्यक्‍तींचा अंदाज घेऊन कृती करावी.

3) मिथुन : नोकरीत योग्य पद्धतीने काम हाताळलेत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. कोणतेही निर्णय सावधानतेने घ्या.

4) कर्क : दोन पिढीतील वैचारिक मतभेद होतील. प्रवासाचे योग येतील. त्यामधे चीजवस्तू सांभाळा.

5) सिंह : जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात लांबवलेला शुभसमारंभ निश्‍चित करता येईल.

6) कन्या : घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

7) तूळ : काळाबरोबर राहून प्रगती करा, हेच खरे. व्यवसायात प्रगती साधण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील.

8) वृश्‍चिक : उलाढाल व विक्री वाढली तरी त्यातील फायदा कमी असेल. योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील.

9) धनु : खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत प्रयत्न करूनही कामं न मिळाल्याने चिंता वाटेल.

10) मकर : पैशाचे गणित बसवणे अवघड जाईल. घरात सर्वांच्या गरजा भागवताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.

11) कुंभ : तरुणांनी संयम राखून वागावे. तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

12) मीन : नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळणारी संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *