देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही अधिक, कोरोनाबळीही वाढले

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत

Advertisement
(COVID-19 patients) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 39 हजार 97 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तर अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्येही तीन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 546 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 97 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 546 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 87 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 13 लाख 32 हजार 159 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 3 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 20 हजार 16 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 8 हजार 977 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 42 कोटी 78 लाख 82 हजार 261 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 39,097

देशात 24 तासात डिस्चार्ज – 35,087

देशात 24 तासात मृत्यू – 546

एकूण रूग्ण – 3,13,32,159

एकूण डिस्चार्ज – 3,05,03,166

एकूण मृत्यू – 4,20,016

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,08,977

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 42,78,82,261

गेल्या 24 तासातील लसीकरण – 42,67,799

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *