घरात झाला पालींचा सुळसुळाट; ‘या’ उपायांनी संपवा कायमचा त्रास

आपलं घर स्वच्छ आणि निरोगी (Clean & Healthy) राहावं यासाठी आपण वेळोवेळी साफसफाई  (Cleaning) करत असतो. मच्छर,मुंग्या, किडे, जीवजंतू घरामध्ये वाढू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल (Pest Control) करतो. विविध उपाय देखील करत राहतो. मात्र तरी देखील घरामध्ये काही जीवजंतू वाढतच असतात. घरात इंसेट्स (Insect) वाढल्यानंतर पाली देखील यायला लागतात.

Advertisement

कोल्हापूर महापुर आजचे अपडेट्स

बऱ्याच जणांना पालीला (Lizard)  पाहुन भीती वाटते. पालीदेखील आरोग्यासाठी धोकादायक  (Harmful For Health) असतात. पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. याशिवाय जेवणामध्ये पाल पडली तर, असं अन्न खाल्लास मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे घरांमधून पाली घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. घरात लहान मुलं असतील तर पेस्ट कंट्रोल करायला भीती वाटते. पाली घरामधून घालवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.

पुन्हा ‘कोल्हापूर’सह सहा जिल्ह्यांसाठी अलर्ट

मिरचीचा वापर

लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यामध्ये मिसळून घरांमधल्या कोपऱ्यांमध्ये, खिडकी, दरवाजांवर याचा स्प्रे मारा. यामुळे पाली घरातून पळून जातील. मात्र हा स्प्रे करताना आपल्या अंगावर पडणार नाही किंवा डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

लॉकडाऊन निर्बंधात मिळणार सूट…

अंड्याचं कवच

अंड्याच्या कवचामधून येणाऱ्या वासामुळे(Insect)पाली पळून जातात. त्यामुळे अंड्याचं कवच घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा घराच्या वरच्या भागामध्ये ठेवून द्या.कॉफी

पाल पळवण्यासाठी कॉफी पावडर देखील वापरता येते. कॉफी पावडरमध्ये तंबाखू टाकून छोटे छोटे गोळे तयार करा. पाली ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी आणि ठेवून द्या.

लसूण

लसणाला उग्र वास येतो. लसणाच्या पाकळ्या दरवाजे, खिडक्या आणि कोपऱ्यांमध्ये ठेवा. त्यामुळे पाली घरात येऊ शकणार नाहीत.

उदगांव -अंकली पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू

नेप्थालिन बॉल्स

नेप्थालिन बॉल्स किंवा डांबर गोळ्यांमुळे पाली पळून जातात. हे बॉल्स घरात वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवून द्या.

मोरपीस

मोरपीस घरात ठेवल्यामुळे पाल पळून जाते असं म्हटलं जातं. याचाही वापर करून पहा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *