सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ

gold

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या

Advertisement
(Gold) दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. एकीकडे सोन्याचे दर स्थिर असताना चांदी च्या दरात मात्र 400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदी साठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत. गेल्या सहा दिवसांचा विचार करता सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर पुढचे तीन दिवस सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. चांदीच्या दराचा विचार करता त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *