तीन दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण; वाचा किती रुपयांनी झाली घट

मागील तीन दिवसांपासून सोन्याचे

Advertisement
(Gold) दर जैसे थे राहिल्यानंतर आता त्यामध्ये पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,660 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,660 रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही 400 रुपयांची घट झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,100 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या आठवड्याचा विचार करता सोन्याची किंमतींत घसरण आणि स्थिरता दिसून येते. 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले.

त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *