कोल्हापुरात उद्धव-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं काही…

Devendra-Fadanvis-Uddhav-Thackeray

politics meeting – कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांची अचानक समोरासमोर भेट झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) तिथे पोहोचले.

Advertisement

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी रस्त्यातच एकमेकांशी काही वेळ चर्चा केली. काही मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

12 वीचा निकाल दुपारी होणार जाहीर

देवेंद्र फडणवीस आधी पोहोचले होते. लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. इतके दिवस कोणी आले नव्हते, तुम्ही आलात असं स्थानिक फडणवीसांना म्हणाले. त्याच वेळी उद्धव ठाकरेही शाहूपुरी इथे पोहोचले आणि आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली.यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.

माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सांगितलं की जर मुख्यमंत्र्यांनी बैठक (politics meeting) बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहू, असं कळवलं आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *