कोल्हापूरसह अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम

pune lockdown

राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या आणि रुग्णसंख्येची टक्केवारी घटलेल्या मुंबई, पुण्यासह 25 जिल्ह्यांमधील निर्बंध (restriction) शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Advertisement

मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा आदी 11 जिल्ह्यांना अद्याप तिसर्‍या श्रेणीत ठेवण्यात आल्याने कोरोनाचे निर्बंध (restriction)  कायम ठेवले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला असून दोन दिवसांत निर्णय घेऊन तसा जीआर काढला जाईल, असे टोपे म्हणाले. मुंबईतील लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्यावर आजही निर्णय झाला नाही. त्यावर दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *