कोल्हापूरचा संपर्क तुटू देणार नाही

महापुरात कोल्हापूरचा (Kolhapur) पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक (transport service) मंत्री  नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांना दिली.

Advertisement

महापुरात राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होऊ नयेत. यामुळे आवश्यक ती मदत व बचावकार्य राबवण्यासाठी पूरबाधित शहरांचा संपर्क तुटू नये, यादृष्टीने महामार्गांची बांधणी करावी, यासाठी संभाजीराजे यांनी गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व पत्र दिले. त्यावर गडकरी यांनी अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा स्तर पूर्वी आलेल्या पुराच्या पाण्याच्या कमाल पातळीपेक्षाही जास्त वाढवावा.पाणी उंचावरून उताराकडे सहज वाहून जावे यासाठी मोठे नळे व पूल बांधले जावेत.या भागातील इतर राष्ट्रीय महामार्गांचीही (transport service) उंची वाढवावी, जेणेकरून पूरस्थितीचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करता येईल.राष्ट्रीय महामार्ग हे आणीबाणीच्या प्रसंगी ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून उपयोगात यायला हवेत. अगदी बिकट स्थितीतही ते चालू राहिले पाहिजेत.राष्ट्रीय महामार्ग हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील लोकांसाठी जीवनरेखा आहेत. त्यांचे नियोजन करताना एनएचएआयने इस्रो व एमआरएसएसी, नागपूर यांच्याशी सल्लामसलत करावी.

त्यांना रस्ते बांधणीच्या नियोजनात सहभागी करून घ्यावे.उपग्रहांकडून मिळणाऱ्या डेटाचा रस्ते बांधताना विचार केला तर अगदी गंभीर पूरस्थितीत रस्ते अत्यावश्यक वाहतुकीसाठी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असतील.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *