चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायच्याय?; ‘हे’ उपाय कराच!

जस जसं वय वाढतं तस तसं आपलं वय आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतं. चेहऱ्यांवरील सुरकुत्यांमुळे (winkles) लगेच वय दिसून येतं. काही तरुणांना तर अकाली म्हातारपण येतं. त्यांच्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या स्पष्टपणे दिसू लागतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, अनिद्रा आदी कारणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. मात्र, काही उपाय केल्यास या सुरकुत्या घालवता येतात.

Advertisement

सुरकुत्या का पडतात?

चेहऱ्यावर चुकीचे कॉस्मेटिक लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

>> त्वचा शुष्क असेल तर सुरकुत्या पडतात. किंवा त्वचा शुष्क ठेवण्यासाठीची क्रिम वापरल्यानेही सुरकुत्या पडतात.

>> प्रदूषणामुळेही सुरकुत्या पडतात.

>> तणाव आणि पुरेशी झोप न झाल्यानेही सुरकुत्या पडतात.

>> चेहऱ्याला अति ताण दिल्यानेही सुरकुत्या पडतात.

उपाय काय?

त्वचेची निगा राखा: सुरकुत्या (winkles) पडू द्यायच्या नसेल तर चेहरा शुष्क आणि निस्तेज असता कामा नये. दिवसातून दोनदा चेहरा धुवून काढा. चेहरा मुलायम राहील अशीच क्रिम वापरा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी माईल्ड क्लिंजरचा वापर करा. माइल्ड स्क्रबचाही वापर करा. उन्हात जाताना गॉगल लावा. चेहऱ्याला सुती कपड्याने झाकून ठेवा.

फेस एक्सप्रेशन्सची काळजी घ्या: तुम्ही एकच प्रकारे एक्सप्रेशन देत असाल किंवा बराच काळ चेहरा एकसारखा ताणून ठेवू नका. असं करत असाल तर रोज झोपताना क्रिमने चेहऱ्याची मसाज करा.भरपूर झोप घ्या: ब्युटी स्लीप असं झोपेचं वर्णन केलं जातं. म्हणजे तुम्ही गाढ झोप घेतली तर तुमचं पूर्ण शरीर रिपेअर होतं. मात्र, चांगली आणि पुरेशी झोप न झाल्यास तणाव वाढतो. त्यामुळे चेहऱ्यावर अकाली म्हातारपण दिसू लागतं.

खाण्यापिण्यात बदल करा: चांगले पदार्थ खाल्ल्यास चेहरा चमकदार होतो. त्यामुळे आहारात फळ आणि हिरवा भाजीपाला घ्या. सॅलड आणि दहीचाही समावेश करा. नाश्त्यात ड्रायफ्रुट्स घ्या. दिवसातून कमीत कमी दहा ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुमची त्वचा टवटवीत राहील.

टेन्शन घेऊ नका: कमीत कमी टेन्शन घेण्याचा प्रयत्न करा. टेन्शन असेल तर ते सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. जेव्हा तुम्ही तणावात असता त्यावेळी तुमच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं. हे हार्मोन कोलेजनला ब्रेक करतात. कोलेजन त्वचेला टवटवीत ठेवण्यात मदत करत असतात. त्यामुळे तणावापासून दूर राहा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *