इचलकरंजी शहरात पूर ओसारलेल्या परिसरात माणुसकी फौंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम

इचलकरंजी शहरात पूर ओसारलेल्या परिसरात माणुसकी फौंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम (Sanitation campaign) राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आज सकाळी जॅकवेल परिसरातील साठलेला कचरा गोळा करून स्वछता करण्यात आली.

Advertisement

मागील आठवड्यात इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीला महापूर आला होता. त्यामुळे नदी काठच्या परिसरासह नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी साचले होते त्यामुळे अनेक घरांची पडझड होऊन प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले होते या शिवाय पूर बाधित शेतातील पिके पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पण गेल्या काही दिवसांपासून महापुराचे पाणी संथ गतीने ओसरू लागले आहे. त्यामुळे नदिवेस नाका, शेळके मळा, जुना चंदूर रोड या परिसरातील नागरी वस्तीमधील पाणी ओसरले आहे त्यामुळे पूर ओसरलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि माती साचून दुर्गंधी सुटली आहे.

परिणामी संभाव्य साथीचे आजार फ़ैलावण्याचा धोका वाढला आहे ही समस्या लक्षात घेऊन माणुसकी फौंडेशन वतीने काल शुक्रवार पासून मरगुबाई मंदिर, श्रीपाद नगर परिसरात स्वछता मोहीम (Sanitation campaign) राबिवण्यात आली तसेच आज शनिवारी सकाळी जॅकवेल परिसरात मोठ्या प्रकान5 साचलेला कचरा, माती गोळा करून स्वच्छता करण्यात आली. यावेळी कचरा व माती एकत्र करत असताना काही दुर्मिळ जातीचे आठ सर्प सापडले त्यांना सर्पमित्रांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.याचवेळी इचलकरंजी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांच्या सह अधिकाऱ्यांनी जॅकवेल परिसराला भेट देऊन पाहणी केली यावेळी श्री सुर्वे यांनी इचलकरंजी शहराला तातडीने पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाला माणुसकी फौंडेशनने स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मोठा हातभार लावल्याचे सांगून या कार्याबद्दल कौतुक केले.

ही स्वछता मोहीम या पुढील काळात देखील सक्षम पणे राबिवण्यात येणार असल्याचे माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे यांनी सांगितले. यावेळी या स्वछता मोहीम मध्ये माणुसकी फौंडेशनचे सर्व सदस्य सहभागी झाले होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *