कोल्हापुरातील कोरोना चकवा देणारा…!!

kolhapur corona cases: कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून तब्बल चार महिन्यांनी रुग्णसंख्येचा आलेख उतरता दिसत असला, तरी तो चकवा देणारा आहे. कारण या घसरत्या रुग्णसंख्येला चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण जबाबदार तर आहेच.

Advertisement

शिवाय कोरोना मृत्यूंची संख्या अद्याप कमी होत नसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी प्रभावी लसीकरण आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचे नागरिकांना काटेकोर पालन करावे लागेल. अन्यथा कोरोनाचा मुक्काम गणेशोत्सवापर्यंत लांबू शकतो.kolhapur corona कोल्हापुरातील कोरोनाची स्थिती हा जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय होता. देशातील 700 जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांतून कोरोना लाट ओसरल्याचे संकेत मिळाले, तरी कोल्हापुरात मात्र कोरोना वाढत होता आणि दैनंदिन रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या दरम्यान नोंदवित कोरोना बळींची संख्याही सरासरी 25 ते 30 च्या दरम्यान राहत असल्याने कोल्हापुरातील कोरोना हा राज्याच्या चिंतेचा विषय होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र या आकडेवारीत थोडा फरक पडला.

रुग्णसंख्या (kolhapur corona cases) हजाराच्या खाली घसरली आणि 26 तारखेला तर ती 355 पर्यंत खाली आली. यामुळे कोल्हापुरातील कोरोना संपला असे समजून नागरिकांची जीवनशैली सैल होऊ लागली आहे. राज्यकर्त्यांच्या मेळाव्यात, पूर पाहणी दौर्‍यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांना सोडचिठ्ठी दिली जाऊ लागली आहे. शिवाय बाजारपेठांतही लोक गर्दी करताना दिसताहेत. तथापि, ही रुग्णसंख्या चकवा देणारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *