कोल्हापूर महापूर : गावांमध्ये पंचनामे सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेला महापूर ओसारल्यानंतर शिरोळ तालुक्यातील शिरटी, हसुर, अर्जुनवाड, कनवाड,कुटवाड, घालवाड या गावांमध्ये घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या कुटूंबाचे पंचनामे (Punchnama

Advertisement
) सुरू आहेत.

पंचनाम्याद्वारे सानुग्रह अनुदानाचे लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहे. हा पंचनामा अमान्य असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गावांना बेटाचे स्वरूप असल्याने ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.त्यामुळे ही गावे १०० टक्के करून सर्वच कुटुंबाना अनुदान द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ज्या घरात पाणी गेले आहे. त्यांनाच सानुग्रह अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्थलांतरित होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या गावांमधील ४ हजारहून अधिक कुटूंबातील १७ हजार नागरिकांनी ८ हजार जनावरांसाहित बाहेरगावी स्थलांतर केले होते.

पाणी वाढत असल्याने शुक्रवारी रात्री मिळेल ती वाहने भाड्याने घेऊन ८ ते १० हजार रुपयांहून अधिक भाडे देऊन नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले . पुन्हा जनावरे व अन्य साहित्य गावात परत आणण्यासाठी तेवढेच भाडे मोजावे लागणार आहे.यामुळे स्थलांतरित झालेले नागरिक यामध्ये भरडले गेले आहेत.

पावसामुळे व महापुराच्या कालावधीत मजुरांचा गेल्या १५ दिवसांपासून रोजगार बंद आहे. तसेच शेतीतील पिकांचे नुकसान झाल्याने पुढील काही महिने मजुरांना रोजगाराविना घरात बसून राहावे लागणार आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या पंचनाम्याविरोधात नागरिक आक्रमक असून शिरटीसह अर्जुनवाड परीसरातील नागरिकांनी तहसीलदारांना १०० टक्के अनुदान मिळण्यासाठी निवेदन दिले आहे. कनवाड, कुटवाड, घालवाड, येथील नागरिकांनी पंचनामे (Punchnama) होऊ न देण्याचे ठरवले असल्याने पंचनामे थांबले आहेत.

तसेच या गावांत २००५ आणि २०१९ च्या महापुरात १०० टक्के अनुदान दिले आहे. मग आत्ताच का नाही ? असा सवाल देखील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *