‘मी टिळकांसारखा जहाल’; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाची आज सुरुवात करण्यात आलीये. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. देशात सध्या हुकूमशाही सुरु आहे. विरोधकांवर कारवाई करत त्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे आपल्याला दुसरा स्वातंत्र्य लढा सुरु करावा लागेल, असं पटोले (criticize) म्हणाले.

Advertisement

काही लोक माझ्याविरोधात दिल्लीत तक्रार करतात, मी जहाल असल्याचं म्हणतात. पण, मी टिळकांसारखा जहाल गटात मोडतोय, असं म्हणत त्यांनी स्वपक्षीय नेत्यांवर टीका केली. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधातील लढ्याची सुरूवातही टिळक वाड्यातून करूयात. हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढाच म्हणा फारतर.

पण ही लढाई आपण पुन्हा लढुयात आणि जिंकुयात, असं आवाहन पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं. चीन आपल्यावर कधीही हल्ला करु शकतो. पण, पंतप्रधान मोदी याविषयी काही बोलत नाही. आवाज उठवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते.

इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यात काहीही फरक राहिला नाही. देशात हुकूमशाही सुरु आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांचीच बदनामी केली जात (criticize) आहे, असंही ते म्हणाले.नाना पटोले यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-केंद्रामध्ये आलेले सरकार संविधान मानायला तयार नाही

– तो काळ नवीन पिढीसाठी प्रेरणा दायी

– चारही स्तंभ संपविण्याचे काम सुरू आहे

– पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपाल यांना शोभत नाही

– टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू

– केंद्रातील सरकार जासुसी करत आहे

– तसा काँग्रेस पक्ष नाही

– अडचणीत आले आहेत त्यांना आम्ही मदत करतोय

– परिस्थिती प्रमाणे पूरग्रस्तांना मदतीचे कार्य सुरू

– माझी तक्रार देशाच्या प्रमुखाकडे होतेय

– नाना पटोले देशासाठी लढतोय

– हाय कमांडकडे कुठलीही तक्रार नाही

– Mpsc बाबत अजित दादांना भेटणार आहे

– आमचीही मागणी आहे, लवकर जागा भरल्या पाहिजे

– तोडण्याची भाषा म्हणजे त्या पक्षाची प्रवृत्ती आहे

– आमची प्रवृत्ती गांधी विचारांची

– त्यावर आम्ही काही जास्त बोलू इच्छित नाही

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *