महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, अहमदनगर, सांगलीसह साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

FILE PHOTO: The ultrastructural morphology exhibited by the 2019 Novel Coronavirus (2019-nCoV), which was identified as the cause of an outbreak of respiratory illness first detected in Wuhan, China, is seen in an illustration released by the Centers for Disease Control and Prevention (CDC) in Atlanta, Georgia, U.S. January 29, 2020. Alissa Eckert, MS; Dan Higgins, MAM/CDC/Handout via REUTERS

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना

Advertisement
(COVID-19) विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात काल 6959 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यात 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली होती. महाराष्ट्रातही काही जिल्हे अ‌ॅलर्ट झाले असल्याचं समोर आलंय.

लातूर जिल्ह्यात 28 नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने 28 रुग्ण आढळले आहेत , त्यामुळे बाधितांची संख्या 91 हजार 355 वर पोहंचली आहे . आता पर्यंत 88 हजार 782 जणांनी कोरोनावर मात केली आहे . सध्या 163 रुग्ण उपचार घेत आहेत . तर आता पर्यंत कोरोनाने 2 हजार 410 जणांचा बळी घेतलेला आहे . कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने लोक बाजारपेठेत गर्दी करताना पहायला मिळत आहेत . वास्तविक पाहता लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

अहमदनगरमध्ये हजार रुग्णांची वाढ

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 5 दिवसात जिल्ह्यात सरासरी दररोज 1 हजार रुग्ण कोरोनाबधित होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 5687 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने संगमनेर, कर्जत आणि पारनेर या 3 तालुक्यात सर्वाधिक रुग्ण हे कोरोनाबधित होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. सायंकाळी 4 वाजे पर्यंत सर्व आस्थापना सुरू राहणार असून त्यानंतर सर्व दुकाने, कार्यालये बँड ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकरी यांनी दिले आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत आणि शेवगाव तालुक्यात दौरा करून कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात रुग्णवाढ

इंदापूर तालुक्यात मागील काही महिन्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र होते, याच वेळी तालुक्यात रोज नव्याने कोरोना होणाऱ्यांची संख्या 20 च्या आसपास होती, मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे रोज साधारणतः 50 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात तर सध्या बेड शिल्लक नाहीत, उपजिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने काही महिन्यांपूर्वी बंद ठेवण्यात आलेले कोव्हिड सेंटर आता पुन्हा सुरू करावे लागले आहे. सध्या तालुक्यात तीनशे च्या आसपास रोज चाचण्या घेतल्या जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे, मागील फक्त जुलै महिन्यात तब्बल 1012 नवीन कोरोना रुग्णांची संख्या असून यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.. सध्या इंदापूर तालुक्यात 356 अ‌ॅक्टिव्ह पेशंट आहेत, तर आज पर्यंत तालुक्यात 428 रुग्णांचा मृत्यू झाला आहे..

सांगली जिल्ह्यात 843 नवे रुग्ण

सांगली जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात 843 जणांना कोरोनाचे निदान झाले, तर 886 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवीन रुग्ण नाही आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला.एकूण 341 रुग्ण सध्या आहेत. सरासरी साडेसहाशेवर असलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यू झाला, त्यात सांगली 1, मिरज 2, मिरज तालुक्यातील 1, खानापूर 3, जत, कडेगाव तालुक्यात प्रत्यकी 1 शिराळा काय नाही आणि वाळवा तालुक्यात 3 मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत 7830 जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात 495 जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या 7918 जणांच्या नमुने तपासणीतून 362 जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या 7304 जणांपैकी 949 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 790 जण ऑक्सिजनवर तर १47 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला तर नवीन १2 रुग्ण उपचारास दाखल झाले.

रत्नागिरी कोरोनाचे 256 रुग्ण

रत्नागिरीत ही कोरोनाचे 2074 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासातील कोरोनाचे 256 रुग्ण वाढले आहेत. दररोज 200 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात रोज 5 हजाराहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्ह्याचा रिकवरी रेट -93 टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर-2.82 टक्के आहे.

साताऱ्यातही रुग्ण वाढ

सातारा जिल्ह्यातील 675 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील 24 तासात 11577 नागरिकांच्या कोरोणा चाचण्या करण्यात आल्या.या पैकी 675 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सातारा जिल्ह्यात 5,297 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5.8 इतका आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 11,351 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

नागपूर कोरोना अपडेट 

नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद झाली आहे. एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 15 जणांनी कोरोना वर मात केली आहे. नागपूरमधील एकूण रुग्ण संख्या 492889 पोहोचली आहे. तर एकूण बरं होणाऱ्यांची संख्या 482578 वर गेली आहे. नागपूरमध्ये कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या 10117 वर पोहोचली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *