आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आला तर सोडत नाही

भाजपा (political party) आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या व्हिडीओशिवाय भाजपाकडून अधिकृत अशी भूमिका आली नव्हती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (political leader) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

“तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही”, असं देखील फडणवीस (political leader) यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे.

आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *