…ही हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली; शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

political leadres

politics news- कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

Advertisement

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. (politics news)अलिकडे महाराष्ट्रावर काही ना काही सातत्याने संकटं येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट राज्यावर आलं… हजारो घरं पडली… अनेक घरांमध्ये पाणी शिरलं… होतं नव्हतं ते वाहून गेलं… पण एक गोष्ट चांगली आहे, या संकटातवरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

म्हणून एका बाजूने या पूरग्रस्त घरांची बांधणी करणे हे सरकारसमोर आव्हान आहे. दुसरीकडे मागील 100 वर्षापासून या मुंबईमध्ये कष्ट करुन महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचं पाऊल पडतंय, याचा मला मनोमन आनंद होतोय.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *