अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा

पॉर्नोग्राफी प्रकरणातील उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. रोज एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर येत आहे. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री शर्लिन चोप्रा. शर्लिन चोप्राने क्राईम ब्राँचच्या (crime branch) प्रॉपर्टी सेलला जबाब (investigation) दिला आहे.

Advertisement

यावेळी शर्लिनने राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव पुढे केलं आहे. त्यामुळे आता शिल्पाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होवू शकते अशी शक्यता नाकारता येत आहे.

शर्लिन चोप्राने सांगितलं की, राज कुंद्राने चित्रपटात काम करण्यासाठी संपर्क साधला. सुरूवातीला ग्लॅमरबद्दल सांगितलं. त्यानंतर सांगितलं चित्रपट ग्लॅमरस असेल एवढंच नाही तर ग्रिड ग्लॅमर असेल. कालांतराने इरॉटिकानंतर न्यूड चित्रपट आणि अश्लील चित्रपट चित्रीत करण्याचं काम सुरू झालं.



शिल्पाचं नाव पुढे करत शर्लिन (investigation) म्हणाली, ‘आम्हाला सांगण्यात आलं की आपण जे काम करत आहोत ते खोटं नाही. यादरम्यान आम्हाला कोणतीही लिगल नोटीस देखील दिली नाही. तेव्हा काही चुकीचं आहे असं काहीचं वाटलं नाही. राज आणि शिल्पा नेहमी कामाचं कौतुक करायचे. जे लोक चांगल्या ब्रँडसाठी काम करतात. ज्यांची स्वतःची क्रिकेट टीम आहे, तो माणूस वाईट किंवा चुकीचा कसा असू शकतो.’

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *