नीरज चोप्राने आपलं सुवर्णपदक कोणाला समर्पित केलं आहे, जाणून घ्या…

जी गोष्ट अपूर्ण राहिल्याने भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग आणि पी.टी.उषा यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं, ती पूर्ण झाली. ट्रॅक अँड फील्डमधील शतकांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकाला (gold medal) गवसणी घालत सगळे अपयश धुवून टाकले. हे टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक ठरले.

Advertisement

1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग भारतासाठी पदक जिंकण्यात अपयशी ठरले होते. इतर खेळाडूंपेक्षा शर्यत पूर्ण करायला सेकंदाच्या दहाव्या भागा एवढा उशीर झाला. त्यामुळे त्यांना पदक जिंकता आले नाही आणि रिकाम्या हाती परतावे लागले होते. 

नीरजच्या यशानंतर मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग म्हणाले की, ”आज वडील स्वर्गातून आनंदाश्रू ढाळत असतील. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. नीरजच्या त्यागाला आणि मेहनतीला सलाम.” सुवर्णपदक (gold medal) जिंकल्यानंतर नीरजनं आपलं पदक महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केलं आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *