राहुल गांधींविरोधात ट्विटरची मोठी कारवाई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून शनिवारी कारवाई करण्यात आली. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांनी ट्विटरला (twitter account) दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. “राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट (twitter account) तात्पुरतं बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली. तोपर्यंत राहुल गांधी इतर माध्यमातून तुमच्या संपर्कात राहतील आणि लोकांसाठी आपला आवाज उठवत राहतील असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

 दरम्यान याप्रकरणी राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधत ट्विटरला भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला आहे.

“भाजपाने केलेल्या तक्रारीच्या आधारे राहुल गांधींचं ट्विटर खातं लॉक करण्यात आलं आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे.

त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असतं,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *