कोल्हापूर जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउनबाबत महत्वाची बातमी…

कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन (lockdown) पद्धत बंद आहे. शनिवारी व रविवारी दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत.

Advertisement

वाचा कोल्हापूर कोरोना रुग्ण संख्या अपडेट

ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची टक्केवारी जास्त, तेथे दुकाने सुरू करण्याला राज्य शासनाने वेळेची मर्यादा घातली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने यापूर्वी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू होती; पण नंतर राज्य शासनाने सर्वच दुकानांची वेळ वाढवून ती रात्री १० पर्यंत केली.

तालिबानला जबर दणका…आता मराठा आरक्षणाची जबाबदारी राज्याची

या आदेशाची अंमलबजावणी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारीच केली. या आदेशात वीकेंड लॉकडाऊन (lockdown) अंमलबजावणीबाबत कोणतेच आदेश नसल्याने शनिवारी व रविवारी दुकाने शासन आदेशाप्रमाणेच पूर्ववत सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत.

Advertisement

1 thought on “कोल्हापूर जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउनबाबत महत्वाची बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *