‘द कपिल शर्मा’ शो फेम कॉमेडीयनला लागलं ड्रग्सचं व्यसन, पुनर्वसन केंद्रात केलं दाखल

टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मामध्ये काम करणारा कॉमेडीयन सिद्धार्थ सागर याला ड्रग्सचे व्यसन लागले आहे. ड्रग्सच्या पूर्णत: आहारी गेलेला सिद्धार्थ 26 ऑगस्टला मुंबई पोलिसांनी वाईट स्थितीमध्ये आढळला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या आईशी संपर्क साधला आणि त्याला पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धार्थची आई म्हणाली की, मुलाला मी नेहमीच ड्रग्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी नेहमीच त्याच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होते. त्याला कधीही एकटे सोडले नाही. मात्र पाळीव प्राण्याची प्रकृती बिघडल्याने मला तातडीने दिल्लीला जावे लागले. दिल्लीवर परतत नाही तोच सिद्धार्थबाबत फोन आला. नक्की काय चूक झाली हेच समजत नसल्याचे हतबल झालेली सिद्धार्थची आई म्हणाली.

पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल होण्याची सिद्धार्थची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये सिद्धार्थ काही दिवसांसाठी गायब झाला होता आणि परत आल्यावर आपल्या त्रासाबद्दल सांगितले होते. पुनर्वसन केंद्रामध्ये समस्येवर उपाय सुरू असल्याचे त्याने म्हटले होते.

दरम्यान, सिद्धार्थच्या आईने आपला मुलगा बायपोलर अर्थात मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले होते. मात्र सिद्धार्थने आईचे विधान फेटाळून लावले आणि बायपोलर म्हणजे काय हे मला चांगलेच माहिती असून माझ्यात त्याचे कोणतेही लक्षण नसल्याचे म्हटले होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *