इचलकरंजीकरांचा व प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवणार…

ichallakaranji

गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठ (market) सजावटीच्या साहित्यांनी सजली आहे. शहरातील मुख्य मार्गांसह विविध ठिकाणी सजावटीचे साहित्य व गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारले आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव काही प्रमाणात कमी आल्याने प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली आहे.

Advertisement

तैमूरची दादागिरी, कोणावर भडकला छोटा नवाब?

गांधी पुतळा, मलाबादे चौक, लक्ष्मी मार्केट, सरस्वती मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, कलानगर, विक्रमनगर, डेक्कन चौक, आदी ठिकाणी श्री मूर्तींचे स्टॉल तसेच सजावटीच्या साहित्यांची दुकाने (market) सजली असून खरेदीसाठी गर्दीने फुलून गेली आहेत.

पंचगंगा पाणी पातळीत वाढ…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मंडप उभारणीचे काम गतीने सुरू आहे. मंडळाच्या गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात असून, कुंभारवाड्यात घाई वाढली आहे. अनेकांचा पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे कल दिसून येतो. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसार यंदाही गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.हिटमॅनचं शतक म्हणजे टीम इंडियाचा विजय निश्चित

नगरपालिकेचे फक्त आवाहनच

नगरपालिकेने शहरात ठराविक आठ ठिकाणी गणपती स्टॉल उभारण्यासाठी नियोजन केले होते. त्यानुसार विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु ते फक्त कागदोपत्रीच राहिले. प्रत्यक्षात दरवर्षीप्रमाणे सर्वत्र स्टॉल उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *