केसांसाठी Hair Perfume कसा आणि कशासाठी वापरायचा?

दमट वातावरणात सगळ्यांनाच खूप घाम येतो. एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येतो. कामानिमित्त प्रवास करावा लागत असेल तर अशा लोकांना घामामुळे खूप त्रास होतो. घामाच्या दुर्गंधामुळे (sweat) इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे लोक शरीराला येणाऱ्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सुगंधी वासाचे डिओड्रंट, बॉडी स्प्रे, परफ्युम (Hair Perfume)यांचा वापर करतात.

Advertisement

त्यामुळे घामाचा वास दीर्घकाळ दूर ठेवणं शक्य होतं. ज्याप्रमाणे शरीराला घामाचा वास येतो त्याप्रमाणे केसाताही घाम येत असल्यानं केसांनाही  एक प्रकारचा दुर्गंध येतो. त्यामुळे आता केसांचा दुर्गंध दूर करणारे परफ्युम्स (Perfumes) बाजारपेठेत आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास; आता दिली ‘ही’ जबाबदारी

माणसाच्या बाह्य व्यक्तिमत्वात भर घालण्यात केसांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुरुष असो वा स्त्री घनदाट, काळेभोर केस असणं सगळ्यांनाच आवडतं. सुळसुळीत, चमकदार केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात. याकरता स्त्रिया केसांची विशेष काळजी घेतात. केसांसाठी खास तेल, शॅम्पू यासह अनेक प्रसाधनांचा वापर केला जातो. वयोमानानुसार केस पांढरे होऊ लागले तर त्यांना रंगवले जाते.

‘बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको’

याचबरोबर आता केस सुगंधी राहतील याचीही काळजी घेतली जात आहे. त्यासाठी अनेक प्रकारचे हेअर परफ्यूम्स (Hair Perfumes) बाजारपेठेत उपलब्ध आहेत. केसांना धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे एक प्रकारचा वास येतो. तसंच शॅम्पू न केल्यामुळंही केसांमध्ये दुर्गंधी निर्माण होते.



केसांना अशा विविध कारणांमुळे येणारा वास दूर करण्यासाठी केसांसाठी आलेले खास परफ्यूम उपयुक्त ठरतात. हे वापरायाला अतिशय सोपे असून, त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ड्राय शॅम्पूबरोबर (Dry Shampoo) हे परफ्युम वापरल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

सलमान खानला कोर्टाचा मोठा दिलासा

केसांचा परफ्यूम फक्त दुर्गंधी दूर करत नाही, तर अतिनील किरणांपासून (UVRays) केसांचे संरक्षण होण्यासही मदत करते. केसांची वाढ (Growth) आणि व्हॉल्यूम वाढविण्यातदेखील हे परफ्युम मदत करतात. यामुळे केस तुटणे कमी होते तसेच केसाचा कोरडेपणाही दूर होतो.

अमेरिकाला हवीय भारताची मदत…

हे परफ्यूम केसांना पोषण देण्याचेदेखील काम करतात. केसांना दुर्गंधी येत नसली तरीही तुम्ही शॅम्पू केल्यानंतर त्याचा वापर करू शकता. यामुळे केसांना केवळ आर्द्रता, पोषण मिळतं त्यामुळं केसांचे सौंदर्यही वाढते. केसांना सुगंधी बनवण्याबरोबरच हेअर परफ्यूम केसांना सुळसुळीत (Silky ) आणि चमकदारही (Shiny) करते.

या परफ्यूममुळे केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा कमी करण्याबरोबरच केसांना मॉइश्चराइज (Moisturize) करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आता नेहमीच दिवसभर सुगंधी केसांमुळे प्रसन्नपणा अनुभवता येईल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *