‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, जोरदार टीका

gopichand padalkar

politics criticism -भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर महाज्योती संस्थेतील कारभारावरून निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेची येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी केली आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Advertisement

‘भूल भुलैय्या 2’च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, असं सांगतानाच पडळकर यांनी यूपीएससी परीक्षेवरूनही वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

“ज्यांना पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला”वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता MPSC – UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतोय. काल कुठलीही पुर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परीक्षेचे आयोजन केले आहे. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार (politics criticism) कधी?

पाकिस्तानचं नाक पुन्हा कापलं गेलं…

परीक्षा देणार कधी? UPSC चे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची 10 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *