जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरु, जाणून घ्या डिटेल्स

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी entrance exam, (IIT) आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी आजपासून अर्थात १३ सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र या नोंदणी प्रक्रिया किता वाजता सुरुवात होईल याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जेईईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुरुवातीच्या अडीच लाखांमध्ये नंबर स्थान पटकावणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. उमेदवारांसाठी आयआयटी जेईई परीक्षेसाठी नोंदणी (JEE Advanced 2021 Registration) करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. नोंदणीकृत उमेदवार २० सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतील.

Advertisement

JEE advanced 2021 registration portal

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अद्याप चौथ्या सत्रातील जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. (JEE main result 2021 ) जेईई अ‍ॅडव्हान्स २०२१ साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया परदेशी नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. परदेशी राष्ट्रीय उमेदवार (OCI/PIO card holders) ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे किंवा भारतात १० + २ स्तरावर समतुल्य अभ्यास करत आहेत असे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

JEE Advanced 2021 Registration : जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी असा करा अर्ज

IIT JEE examination साठी उमेदवार खालील स्टेप्सचा वापर करत अर्ज करु शकतात.

१) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.

२) त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.

३) आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.

४) यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.

५) आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.

६) त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.

७) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. (Registration for JEE Advance Exam from tomorrow; know the details)

या नोंदणी प्रक्रियेसाठी महिला उमेदवारांसाठी १४०० रुपये फी भरावी लागेल तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांसाठी आणि इतर उमेदवारांसाठी २८०० रुपये इतकी आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *