विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा: फक्त IPL नाही, वनडे आणि टी-२० मध्ये हिटमॅन भारी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काहीच दिवासंपूर्वी युएई आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला. करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा भारताबाहेर होत असली तर याचे आयोजक बीसीसीआय असणार आहे.भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे (international cricketer) देण्यात आले आहे. पण अचानक चर्चा सुरू झाली की जर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला नाही तर तो कर्णधारपद सोडू शकतो.

Advertisement

वर्ल्डकपपूर्वी ‘स्टार’ क्रिकेटरनं घेतली निवृत्ती

गेल्या काही वर्षात सातत्याने विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा याची तुलना होत आहे. मैदानावर विराट नेहमी आक्रमक असतो. रोहित शर्मा शांत असतो. अनेकांनी रोहितची तुलना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीशी केली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे.

‘तेव्हा मला जगण्याची इच्छा नव्हती’, दीपिकाने केला खुलासा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीच्या ३ मोठ्या स्पर्धेत भाग घेतला आहे. यातील दोन स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तर एकदा सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला.२०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून तर आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव केला होता.

प्रेमविवाहानंतर पतीच जीवावर उठला, झाला हृदयद्रावक शेवट

दुसऱ्या बाजूला रोहित शर्माचे (international cricketer) आयपीएलमधील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने पाच वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. तर विराटला अद्याप पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद मिळून दिले. या शिवाय रोहितने २०१८च्या आशिया कपमध्ये भारताला विजेतेपद मिळून दिले होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *