#CareersInAmazon: आजपासून सुरु होणार Amazon Job Fair, देणार 10 लाख नोकऱ्या

जगातील टॉप इ-कॉमर्स कंपनी Amazon चं आजपासून जॉब फेअर (Amazon Job Fair) सुरू होणार आहे. त्यानुसार साथीच्या काळात बर्‍याच नोकऱ्या बदलल्या आहेत आणि असे बरेच लोक आहेत जे थोडी वेगळी आणि नवीन नोकरी शोधत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही Amazon प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून त्यांना कंपनीमध्ये काम करण्याची (#CareersInAmazon) संधी मिळू शकेल.

Advertisement

काँग्रेसच्या माडीला शरद पवारांचा टेकू

कंपनीच्या म्हणणयप्रमाणे यंदा आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत तब्बल 20% वाढ करणार आहे. तसंच तंत्रज्ञानाशी निगडित हे नवीन जॉब्स असल्यामुळे Amazon ला आपली कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यातही मदत मिळणार आहे असं Amazon चे नवे CEO अँडी जेसी यांनी म्हंटलं आहे.

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याचं नियोजन आहे. तसंच कंपनीला किरकोळ, क्लाउड आणि जाहिरातींसह मागणीसह इतर व्यवसायांशी संपर्क साधण्यासाठी अधिक लोकांची आवश्यकता आहे.त्यानुसार आता Amazon मध्ये भरती होणार आहे.अमेझॉन (amazon) यावर्षी भारतात ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार (#CareersInAmazon) आहे. देशातील ३५ शहरांमध्ये कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात नोकरभरती होईल. यात मुंबई, पुणे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गुरूग्राम, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, जयपूर, कानपूर, कोईमतूर, लुधियाना, सुरत या शहरांचा समावेश आहे.

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

काँग्रेसच्या माडीला शरद पवारांचा टेकू

अमेझॉन ज्या पदांची भरती करत आहे त्यात इंजिनीअरिंग, रिसर्च सायन्स आणि रोबोटिक्स (अमेझॉन हायरिंग प्रोसेस) समाविष्ट आहेत. तसंच गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये Amazon नं तब्बल 5 लाख उमेदवारांना नोकरी दिली होती या नोकऱ्या डिलिव्हरी बॉय आणि इतर पदांशी निगडित होत्या. Amazon चं जॉब फेअर येत्या आजपासून सुरु होणार आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *