नातेवाईकांनी केलं होत दफन, पुन्हा झाली जिवंत; पोलीसही चक्रावले

crime news – ज्या महिलेला (Woman) आपली नातेवाईक (Relative) समजून दफन (Buried) केलं होतं, ती महिला जिवंत (Alive) असल्याचं काही दिवसांनी लक्षात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर तो आपल्याच नातेवाईक महिलेचा असल्याचं सांगत सर्वांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

Advertisement

तिला दफन करण्यात आलं. तिच्या खुनाच्या आरोपाखाली पतीला तुरुंगात धाडण्यात आलं. मात्र काही दिवसांनी ही महिला जिवंत असून मुलासोबत राहत असल्याचं पोलिसांना समजलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास; आता दिली ‘ही’ जबाबदारी

झारखंडच्या पलामू गावात काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. खुशबून निशा नावाच्या महिलेचा हा मृतदेह असल्याची ओळख तिच्या नातेवाईकांनी पटवली होती. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमॉर्टेम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरु, जाणून घ्या डिटेल्स

तिचा दफनविधीदेखील पार पडला होता. आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप खुशबूनच्या आईवडिलांनी तिच्या पतीवर केला होता. त्यावरून पोलिसांनी खुशबूनचा पती जावेद अन्सारीला अटकही केली होती. मात्र काही दिवसांनी अचानक खुशबून जिवंत असल्याचं पोलिसांना समजलं.खुशबून जिवंत असल्याची माहिती

खुशबून ही छतरपूर गावात आपल्या लहान मुलासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी खुशबूनचा पत्ता शोधला आणि ती खरोखरच जिवंत असल्याचं पोलिसांना दिसलं. यामुळे आता प्रकऱणात नवा ट्विस्ट आला असून खुशबून मुळात घरातून गायब का झाली, याचा पोलीस शोध घेत आहेत. (crime news)

मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूचा मोठा खुलासा

खुशबून आणि जावेद अन्सारी यांचं 2013 साली एकमेकांशी लग्न झालं होतं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात भांडणं आणि वाद सुरू झाले होते. जावेदनं अनेकदा खुशबूनला मारहाण केल्याची तक्रार तिने पोलिसांत नोंदवली होती. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींनी दिली होती.

हसन मुश्रीफांवरील आरोपावरून भाजपवर पलटवार

मात्र त्या रागातून पतीने तिचा खून केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला होता. आता मात्र खुशबून जिवंत असल्याचं सिद्ध झाल्यामुळे तिच्या पतीवरील खुनाचे आरोप मागे घेण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *