चीनमधील फुजियान प्रांतात डेल्टाचा प्रादुर्भाव वाढला

चीनमधील दक्षिणेकडील फुजियान प्रांतात करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याची लक्षणे आहेत. फुजियान प्रांतातील पुतियान शहरातल्या प्राथमिक शाळेत शुक्रवारी डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्यामुळे प्रशासनाला नव्याने निर्बंध लागू करावे लागले आहेत.

हा प्रादुर्भाव आतापर्यंत सर्व प्रांतभर पसरलेला आहे. एकूण 3 शहरांमधील 100 जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. फुजियान प्रांतात 59, पुतियानमध्ये 24 आणि शियामेनमध्ये 32 रुग्ण सापडले आहेत.

प्राथमिक शाळेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर या प्रांतातील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. आता बालवाडी आणि अगदी पाळणाघरातील लहानमुलांमध्येही हा संसर्ग पसरला असल्याचे दिसून आले आहे. शियामेन आणि पुतियान या दोन शहरांमधील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

पुतियान शहराची लोकसंख्या 30 लाख तर शियान्मेन शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. अनावश्‍यक कारणाशिवाय शहराबाहेर न जाण्याचे आदेश या दोन्ही शहरांमधील नागरिकांना देण्यात आले आहेत.

या दोन्ही शहरांमधून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. शियान्मेन शहरात रुग्ण आढळलेल्या भागात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच लायब्ररी, संग्रहालये, बार, सिनेमागृह आणि जिम बंद केली गेली आहेत. तसेच सर्व सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *