ठरलं! कंगना साकारणार सीतेची भूमिका

entertainment news – गेल्या काही दिवसांपूर्वी केव्ही विजयेंद्र प्रसाद यांच्या ‘The Incarnation- SITA’ या चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी बॉलिवूडची बेबो करीना कपूरच्या नावाची चर्चा देखील सुरु होती. एवढंच नाही तर तिने या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन मागितले होते. मात्र, आता या चित्रपटात सीतेची भूमिका ही बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत साकारणार आहे.

Advertisement

समंथाने शेअर केली नागा चैतन्य आणि साई पल्लवीची ‘लव्हस्टोरी’

कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘The Incarnation- Sita’ या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने आनंद झाला आहे. सीता राम यांच्या आशीर्वादाने…जय सियाराम’, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे. कंगना सीतेची भूमिका साकारणार हे कळताच तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजपाचे उद्या राज्यभर आंदोलन

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एसएस स्टुडिओच्या निर्मात्या सलोनी शर्मा यांनी म्हटले आहे की, ‘एक स्त्री म्हणून कंगनाचे स्वागत करण्यात मला खूप आनंद होतं आहे. ‘The Incarnation Sita’ या चित्रपटात कंगना एक भारतीय महिला किती निर्भयी असते याची प्रमिता साकारणार आहे.’

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”यापूर्वी चित्रपटाचे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनीही सांगितले होते की ‘सीतेचे भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या डोक्यात फक्त कंगनाचे नाव येत आहे.’ या चित्रपटाचे डायलॉग हे मनोज मुंटाशीर यांनी लिहिलेले आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल. (entertainment news)

रक्तपात! तालिबाननं पुन्हा मोडलं वचन

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकरली होती. आता कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *