किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, तसेच इतर अनेक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचंही सोमय्या म्हणाले. दरम्यान, सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळून लावले. किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे असून मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांचा तीव्र निषेध करतो. तसंच, सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील २७०० पानांचे पुरावे ईडीकडे सुपूर्द केलेत. तर दुसरकीडे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहिकीनुसार सोमय्या यांनी केलेल आरोप आणि सत्य परिस्थिती काय आहे, यासंदर्भात माहिती हसन मुश्रीफ यांनी पवारांना दिली. गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या आरोपांना कशी सामोरे जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *