पोलार्ड-डिकॉक खेळणार का नाही? मुंबईसाठी सगळ्यात मोठी अपडेट .

आयपीएलच्या

Advertisement
यंदाच्या मोसमाच्या  दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात असेल. पण मुंबई इंडियन्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू क्विंटन डिकॉक आणि कायरन पोलार्ड सध्या दुसऱ्या स्पर्धा खेळत आहेत. पोलार्ड कॅरेबियन प्रीमियर लीगची (CPL) फायनल आणि क्विंटन डिकॉक श्रीलंकेत तिसरी टी-20 खेळत आहेत. मंगळवारी अखेरची मॅच झाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू युएईसाठी रवाना होणार आहेत. युएईमध्ये दाखल होताच 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं गरजेचं आहे, पण पहिल्या मॅचसाठी आता 6 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरलेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या फ्रॅन्चायजींनी मिळून सीपीएल फायनल खेळणाऱ्या आणि श्रीलंकेत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी दोन स्पेशल चार्टर प्लेन पाठवली आहेत. मॅच संपल्यानंतर खेळाडू आयपीएलसाठी युएईला रवाना होणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. चेन्नईच्या टीममध्ये फाफ डुप्लेसिस, ड्वॅन ब्राव्हो, इम्रान ताहीर सीपीएलमध्ये तर लुंगी एनगिडी श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळत आहेत.

मुंबईचा कायरन पोलार्ड सीपीएलमध्ये आणि क्विंटन डिकॉक श्रीलंकेत खेळत आहे. युएईमधून आल्यानंतर या सगळ्या खेळाडूंना दोन दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. दोन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर खेळाडू आयपीएल टीममध्ये दाखल होतील. बबल टू बबल ट्रान्सफर असल्यामुळे या खेळाडूंसाठी सहा दिवस क्वारंटाईनचा नियम लागू होणार नाही.

युएईमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडू लगेच हॉटेल रूममध्ये आयसोलेट होतील. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जाईल. कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना टीममध्ये जाता येईल. त्यामुळे पोलार्ड आणि डिकॉक यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते दोघंही पहिला सामना खेळण्यासाठी उपलब्ध असतील.

इंग्लंडमधून येणाऱ्यांसाठी वेगळा नियम दुसरीकडे भारतीय टीमचे खेळाडू इंग्लंडमधून युएईमध्ये आले, त्यामुळे त्यांच्यासाठी कोरोनाचा वेगळा नियम लावण्यात आला. इंग्लंडमध्ये असताना टीम इंडियाचे खेळाडू सॉफ्ट बबलमध्ये होते. यामध्ये खेळाडूंना कोरोना नियमांमध्ये दिलासा देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना युएईमध्ये दाखल होताच सहा दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *