धक्कादायक ! उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या महिलेचा विनयभंग…

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या निर्भया प्रकरण ताजे असतानाच आता नाशकातून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरांनीच विनयभंग (Woman molested by Doctor) केल्याची घटना नाशकातून समोर आली आहे.

Advertisement

मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूचा मोठा खुलासा

नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या सदर महिलेची चीड चीड होत होती. त्यावर उपाय म्हणून शहरातील पाथरवट लेन येथील संमोहन तज्ञ या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सदर महिलेचा मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग (molested ) केला.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरु, जाणून घ्या डिटेल्स

त्यामुळे महिलेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी संशयित संमोहन तज्ञ दीपक मुठाळ यांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी दिली आहे.

फक्त सर्दीच नव्हेतर अनेक रोगांवर तुळस अत्यंत गुणकारी!माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास; आता दिली ‘ही’ जबाबदारी

यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *