टीम इंडियातून ‘या’ दिग्गजांना डच्चू, विराटकडून मोठी चूक?

भारतीय क्रिकेट टीमचा (cricketers) इंग्लंड दौरा संपल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते टी- वर्ल्ड कप स्पर्धेचे (T-20 World cup). संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये (UAE) 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून ती 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.

Advertisement

काँग्रेसच्या माडीला शरद पवारांचा टेकू

16 देशांच्या टीम यात सहभागी होणार असून पहिला सामना ओमानमध्ये (Oman) होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (Indian Cricket Board) नुकतीच या स्पर्धेसाठी भारतीय टीम (Indian Team) जाहीर केली आहे.

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

विराट कोहलीच्या (cricketers) नेतृत्वाखालील 15 सदस्यीय टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, काही नवीन चेहऱ्यांचीही वर्णी लागली आहे. मात्र अनुभवी खेळाडूंना वगळल्यानं चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या खेळाडूंची टीममध्ये निवड झाली असती तर ते भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकले असते, असं मत व्यक्त होत आहे.भारतीय टीममध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan), यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांना वगळण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या माडीला शरद पवारांचा टेकू

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

शिखर धवनप्रमाणेच टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यजुवेंद्र चहललाही (Yuzvendra Chahal) संघात न घेतल्यानं चाहते निराश झाले आहेत. विराट कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक असलेल्या चहलसारख्या अनुभवी स्पिनरऐवजी (Spinner) राहुल चाहरला स्थान देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *