अभिषेकने सांगितला हनीमूनचा अजब किस्सा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (popular couples) ही जोडी बॉलिवूडमधल्या अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांची सून असल्यानं ऐश्वर्याचा दबदबाही काही वेगळाच आहे. बच्चन कुटुंबाबद्दल जनतेत प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला लोकांना प्रचंड आवडतं.

Advertisement

दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं, सांगितलं धक्कादायक कारण

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनही सोशल मीडियावर सक्रिय असतात. 2007 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याला आराध्या (Aaradhya) नावाची एक मुलगी (Daughter) असून, तिच्यासह ऐश्वर्या आपले तसेच अभिषेकचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिषेकही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दोघांचंही फॅन फॉलोइंग मोठं आहे. दोघांच्या प्रेमाचे, लग्नाचे किस्से आजही चर्चेत असतात.

पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शाळा बंद; प्रवासावर निर्बंध घातले

‘गुरू’ (Guru) या चित्रपटादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जवळीक निर्माण झाली. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या भेटी नंतरही वाढत राहिल्या आणि एक दिवस दोघांनीही एकमेकांना आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. ‘गुरू’ चित्रपटाच्याच प्रमोशनसाठी जेव्हा दोघंही न्यूयॉर्कला (Newyork) गेले होते, तेव्हा अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं.

मायबाप सरकार खरं बोला…

मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं हा किस्सा सांगितला होता. ‘अभिषेक माझ्यासमोर गुडघे टेकून मला प्रपोज करत होता, तेव्हा मला एखाद्या हॉलिवूड चित्रपटातला सीन सुरू असल्यासारखं वाटत होतं. मी इतकी आनंदी झाले होते, की होकार द्यायला मी मुळीच वेळ घेतला नाही,’ असं तिनं सांगितलं होतं.अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (popular couples) यांचं 2007 साली लग्न झालं. त्यानंतर एका मुलाखतीत अभिषेकने त्याच्या हनीमून ट्रिपबद्दल एक अतिशय मजेदार गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला, ‘हनीमूनसाठी मी ऐश्वर्यासोबत डिस्नेलँडला (Disneyland ) गेलो होतो. तिथे ती मला सोडून मिकी आणि मिनीसोबत पोज देत होती. आम्ही खूप मजा केली होती.’

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलच्या वडिलांनी मुलीसाठी घेतला मोठा निर्णय

अभिषेक बच्चननं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मालदीवला (Maldives) गेलेला असतानाचाही एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ऐश्वर्यासोबत तो मालदीवला गेला असताना त्यानं बीचवर रोमँटिक कँडललाइट डिनरचं नियोजन केलं होतं; पण जोरदार वाऱ्यानं त्याचा बेत उधळून लावला. बीचवर इतका जोरात वारा वाहत होता, की मेणबत्त्या पुन्हा पुन्हा विझत होत्या. एवढंच नाही, तर वाळू जेवणातही येत होती.

‘ही’ आंदोलनाची नौटंकी करून तुम्हाला पाप झाकता येणार नाही!

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला आता 13 वर्षं झाली आहेत, तरीही दोघांमधलं प्रेम आणि विश्वास कायम असून ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसते. ऐश्वर्या तिच्या कुटुंबाला विशेष प्राधान्य देते. त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर तिनं सगळा वेळ तिच्या संगोपनासाठी दिला होता. मुलगी थोडी मोठी झाल्यावर तिनं बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं; मात्र चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं आहे. आता ऐश्वर्या लवकरच मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वान’ (Ponniyin Selvan) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *