“राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?”

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे.

Advertisement

“हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण पाकिस्तानात झालं असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. “नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली.

त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीत अटक केली. हिंदूंच्या सणांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना दाऊदचा छोटा भाऊन अनिस अहमद पैसा पुरवत होता. यांचं प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये झालं”, असं ते म्हणाले.आशिष शेलार यांनी विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अशी गंभीर शंका उपस्थित केली आहे. ” मुंबईत, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होतं. दिल्लीहून येऊन विशेष पथकानं त्यांना अटक केली. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का?

अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असं म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते. याची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? होती तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण तर नाही ना?”, अशी शंका आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *