‘हसन मुश्रीफ भाजपला पुरून उरणार’

MLA-Hasan-Mushrif

‘राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण आजपर्यंत अनेक संकटं ताकदीने परतवणारे मुश्रीफ साहेब हे आरोपांच्या या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील आणि भाजपला ते पुरून (criticizes) उरतील,’ असा विश्वास काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Advertisement

जो रूट ऑगस्टचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, महिला गटात आयर्लंडच्या एमियरची बाजी

पालकमंत्री पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाने सत्तेचं स्वप्न पाहणं, हे क्रमप्राप्त आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यापूर्वी भाजपनेही सत्तेत येण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गानी केला.

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

आता साधारणपणे दोन वर्षांचा काळ गेल्यानंतर महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही, याचे शल्य त्यांना आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केलं (criticizes)  जात आहे.

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजपाचे उद्या राज्यभर आंदोलन

‘लोकशाहीमध्ये महाराष्ट्रातील लोकांनी जो निर्णय दिलेला आहे, त्याला अनुसरून आमदारांनी आणि तीन राजकीय पक्षांनी निर्णय घेतला आणि सत्ता स्थापन केली . राजकारणात ही गोष्ट मनाचा मोठेपणा दाखवून विरोधकांनी मान्य करायला हवी, असं मला वाटते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबतीत जे काही घडत आहे, ते दुर्दैवी आहे,’ असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *