गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; तातडीने बोलावली बैठक

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी (terrorist) धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

Advertisement

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.



दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा (terrorist) मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन होता अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *