JEE Mains Result 2021 : संयुक्त प्रवेश परीक्षा JEE मेन्सचा निकाल जाहीर, असे पाहा तुमचे गुण

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षेचा (JEE Mains) निकाल जाहीर झाला आहे.यंदाच्या वर्षी देशभरातील 44 विद्यार्थ्यांचा NTA स्कोअर 100 पैकी 100 इतका लागल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.राज्यातील अथर्व तांबट, गार्गी बक्षी, सौरभ कुलकर्णी, अमेय देशमुख, स्नेहदीप या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले.

Advertisement

आज (15 सप्टेंबर) दुपारी 1 पासून JEE चा निकाल जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थी jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील. या परीक्षेसाठी देशभरातून 7 लाख 32 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. 332 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. जवळपास 2.5 लाख विद्यार्थी जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी पात्र ठरतील. एकाहून अधिक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले आहे ते ग्राह्य धरले जातील.

या निकालानंतर विद्यार्थ्यांना JEE अॅडवान्स ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठीची नोंदणी NTA ने सुरू केली आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार असून निकाल 15 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केला जाईल. यानंतर आयआयटीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *