धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत अभिनेत्रीकडून लाखोंची लूट

अभिनेत्री निकिता रावल हिला दिल्लीतील शास्त्रीनगर येथे एका धक्कादायक प्रसंगाचा सामना  (shooting) करावा लागला आहे. शास्त्रीनगर येथे बंदुकीचा धाक दाखवत तिला बंदी बनवण्यात आलं. ज्यानंतर तिच्याकडून तब्बल 7 लाख रुपयांची लूट करण्यात आली.

Advertisement

महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजपाचे उद्या राज्यभर आंदोलन

चित्रीकरणासाठी (shooting) निकिता तिच्या मावशीसोबत दिल्लीमध्ये राहत होती. सदर घटना घडली, त्यावेळी ती घरी एकटीच होती. निकिताच्या सांगण्यानुसार तिला चोरांचा चेहराही दिसू शकला नाही, कारण त्यांनी यावेळी मास्क घातला होता.

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्रीला शस्त्राचा धाक दाखवत बंदी बनवत तिच्याकडून 7 लाख रुपयांची लूट करण्यात आली. 31 वर्षीय निकितानं चोरांपासून वाचण्यासाठी स्वत:ला कपाटामध्ये बंद करुन घेतलं होतं. हा सर्व प्रकार आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक असून, यातून सावरण्यासाठी आपल्याला वेळ लागत आहे.आपला जीव वाचला यावरही तिचा विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया देत मी त्यांच्याशी लढले असते तर, मारली गेले असते अशी भीतीही तिनं व्यक्त केली.

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

जो रूट ऑगस्टचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, महिला गटात आयर्लंडच्या एमियरची बाजी

कोण आहे निकिता रावल?

निकिता मुळची मुंबईची राहणारी आहे. 2007 मध्ये ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’ आणि 2009 मध्ये स’द हीरो-अभिमन्यु’ मध्ये तिनं काम केलं आहे. अभिनेता अरशद वारसी याच्या आगामी ‘रोटी कपड़ा और रोमांस’ या चित्रपटातूनही ती झळकणार आहे. कलाविश्वातील या कामाव्यतिरिक्त ती आस्था फाऊंडेशन नामक एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. सध्या मात्र निकितापुढं मोठा अडचणीचा प्रसंग उभा राहिला असून, ती यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *