घटस्फोटानंतर शिखरची इन्स्टाग्रामवर भावूक स्टोरी…

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या आयुष्यात (instagram post) मागील काही दिवसांपासून अक्षरश: वादळ आलं आहे. आधी पत्नी आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) आणि त्याचा घटस्फोट, त्यानंतर आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही.

Advertisement

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

अशा दोन मोठ्या घटनांनी शिखरचं आयुष्य हादरलं असतानाही त्याने आयुष्यातील एक सुंदर क्षण इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केला आहे. हा क्षण म्हणजे शिखर आणि त्याचा मुलगा झोरावर हे दोघेही व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलत आहे. यावेळी ते एकमेकांना किस देत असल्याची एक्शनही करत असून या क्षणाबद्दल बोलताना शिखरने हा दिवसभरातील सर्वात सुंदर क्षण असल्याचं म्हटलं आहे.

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली असून त्यांचा साभांळही शिखर करत होता सोबतच त्यांना असणारा झोरावर हातर दोघांचाही खास लाडका.

राज्यात घडली मोठी धक्कादायक दुर्घटना…

 

पण आता दोघांच्या घटस्फोटानंतर झोरावरची कस्टडी नेमकी कोणाला मिळणार हे माहित नाही. पण शिखरचं मुलावर असणारं प्रेम कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसतं. जे आज पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आलं.

तालिबान सरकारमध्ये फूट, नाराज मुल्ला अब्दुल गनी बरादर कित्येक दिवसांपासून गायब

शिखरच्या पत्नीने तिच्या आणि शिखरच्या घटस्फोटाची माहिती 6 सप्टेंबर रोजी इन्स्टग्राम पोस्टद्वारे (instagram post) दिली. या पोस्टमध्ये तिने अनेक भावनिक अशा गोष्टी लिहिल्या होत्या. दरम्यान आयशा आणि शिखर यांच्या नात्यात 2020 मध्ये तणाव निर्माण झाला असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या.

दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. यासोबतच आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवरच आयशाने घटस्फोटाची पोस्ट लिहित ही सर्व माहिती दिली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *