यॉर्कर किंग लसिथ मलिंगा निवृत्त

आपल्या भन्नाट यॉर्करने रथी-महारथी फलंदाजांची भंबेरी उडवणारा श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा(Bowler Lasith Malinga)

Advertisement
याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ‘यू टय़ूब’ या सोशल साइटवरील चॅनेलद्वारे लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केले.

लसिथ मलिंगाने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. याचसोबत तो जगभरातील विविध लीगमधूनही खेळला. यामध्ये मुंबई इंडियन्स, मेलबर्न स्टार्स, केंट, रंगपूर रायडर्स, गयाना वॉरियर्स, मराठा अरेबियन्स, मॉण्ट्रीयल टायगर्स या संघांचा समावेश आहे. लसिथ मलिंगाने यावेळी या सर्वांचेच आभार मानले.

टी-20च्या इतिहासातील चौथा सर्वोत्तम गोलंदाज

सध्याच्या घडीला जगभरात टी-20 लीगचे आयोजन करण्यात येते. लसिथ मलिंगानेही अशा प्रकारच्या लीगमध्ये ठसा उमटवलाय. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी गारद करणाऱया गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 540 बळी गारद केले आहेत. इम्रान ताहीर 420 बळींसह दुसऱया तर सुनील नारायण 411 बळींसह तिसऱया स्थानावर आहे. लसिथ मलिंगाने 390 फलंदाज बाद केले आहेत.

क्रिकेट कारकीर्दीत मिळवलेला अनुभव भविष्यात युवकांना देणार आहे. ज्या युवा क्रिकेटपटूंना देशासाठी, फ्रेंचायझींसाठी खेळायचे आहे अशा क्रिकेटपटूंना निश्चितपणे मार्गदर्शन करीन. – लसिथ मलिंगा

लसिथ मलिंगाची कसोटीतील कामगिरी

 • सामने – 30
 • बळी – 101
 • एका डावात 5 बळी – 3 वेळा अर्धशतक – 1

लसिथ मलिंगाची वन डेतील कामगिरी

 • सामने – 226
 • बळी – 338
 • एका डावात पाच बळी – 8 वेळा
 • अर्धशतक – 1

लसिथ मलिंगाची टी-20तील कामगिरी

 • सामने – 84
 • बळी – 107
 • एका डावात पाच बळी – 2 वेळा
 • गोलंदाजी सरासरी – 20.36
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *